…तर आश्चर्य वाटू देऊ नका, चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य!

…तर आश्चर्य वाटू देऊ नका, चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य!

मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ‘काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचं माहीत नाही, पण त्यांची मुलं तिथं कंटाळली आहेत. त्यामुळेच ती आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे भविष्यात पवारांच्या घरातील कुणी भाजपमध्ये आलं तर आश्चर्य वाटू देऊ नका,’ असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. आम्ही आता थकलो आहोत. त्यामुळे भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील,’ या काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्शिवभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यात प्रचारसभा सुरु आहेत. पवार हे देखील आपल्या जाहीर सभांमधून भाजपवर पलटवार करत आहेत. शरद पवार यांची आज नागपूर जिल्ह्यात प्रचार सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS