नितेश राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर खुनाच्या प्रयत्नांचे कलम लावण्याचे आदेश दिलेत – चंद्रकांत पाटील

नितेश राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर खुनाच्या प्रयत्नांचे कलम लावण्याचे आदेश दिलेत – चंद्रकांत पाटील

मुंबई – खासदार नारायण राणे यांनी मला फोन केला आणि दादा माझ्या मुलाला वाचवा” अशी साद घातली आहे. पण मी त्यांना नकार देत नितेश राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर खुनाच्या प्रयत्नांचे कलम लावा असे आदेश दिले असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. तसेच कर्तव्यदक्षपणे सेवा देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार कायम उभे आहे. या प्रकरणी आरोपींना नक्की शिक्षा होईल असेही आश्वासन चंद्रकांत पाटलांनी शेडेकर यांच्या कुटुंबाला दिले.

दरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आमदार नितेश राणे यांनी उपअभियंते प्रशांत शेडेकर यांना धक्काबुक्की करत चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी ते पोलीस कोठडीत आहेत. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी शेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी शेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शेडेकर यांच्या आईला अश्रू अनावर झाले. तसेच शेडेकर यांच्या कुटुंबाने यात आमच्या मुलाचा काय दोष, आमच्या मुलाच्या प्रामाणिकपणाची शिक्षा का देता असे प्रश्न चंद्रकांत पाटलांना विचारले.त्यावर त्यांनी
खासदार नारायण राणे यांनी मला फोन केला आणि दादा माझ्या मुलाला वाचवा” अशी साद घातली आहे. पण मी त्यांना नकार देत नितेश राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर खुनाच्या प्रयत्नांचे कलम लावा असे आदेश दिले असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS