राज्यात आम्ही शिवसेनेसोबत २०० जागा जिंकू – चंद्रकांत पाटील

राज्यात आम्ही शिवसेनेसोबत २०० जागा जिंकू – चंद्रकांत पाटील

मुंबई – भाजपचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करणार असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत आम्ही शिवसेनेसोबत २०० जागा जिंकू असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यात कोल्हेवाडी इथं सिंहगड रस्त्याच्या कामाचं भूमीपूजन पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान सध्या विरोधकांकडून बुद्धीभेद सुरु आहे. आम्ही चांगली कामं केली आहेत. त्यामुळे ते घाबरले आहेत. अशा परिस्थितीत एकत्र येण्याची भाषा करताहेत. हिंम्मत असेल तर त्यांनी वेगळं लढावं, त्यांच्या जागा ८० वरून ४० वर येतील असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच खड्ड्यांसोबत सेल्फी काढणं सोपं आहे. एवढं होतं तर आधी चांगले रस्ते का बनवले नाहीत असा टोला पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. येत्या दीड ते दोन वर्षांत राज्यातील सगळे रस्ते चकाचक करणार असल्याचंही पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS