चंद्रकांत पाटलांचा उदयनराजेंना टोला, लोकसभा निवडणुकीसाठी दिलं आव्हान !

चंद्रकांत पाटलांचा उदयनराजेंना टोला, लोकसभा निवडणुकीसाठी दिलं आव्हान !

सातारा – भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे. गणेशोत्सवात मोठ मोठ्याने सिनेमातील गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा आणि जर नाचायचेच असेल तर प्रत्येक गावात एक मैदान असते जिथे जाऊन काय धिंगाणा घालायचा आहे तो घाला असा टोला पाटील यांनी उदयनराजेंना लगावला आहे. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार विजयी होईल असा दावाही पाटील यांनी केला आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीने आमचा धसका घेतला आहे, त्यांच्यात दम असेल तर वेगवेगळे लढून दाखवा असं आव्हानही पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यातील 31 गावांना टेम्भू जलसिंचन योजनेतून पिण्याचे पाणी दिले जाणार असून  या योजनेचे भूमिपूजन आज चंद्रकांतदादा पाटील आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी बोलत असताना उदयनराजे भोसले यांना डॉल्बीवरुन टोला लगावला आहे.

COMMENTS