चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला डिवचलं, म्हणाले, “एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही !”

चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला डिवचलं, म्हणाले, “एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही !”

कोल्हापूर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला डिवचलं आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मदत करण्याची भूमिका शिवसेनेचे खासदार मंडलिक यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा अन्यथा, भारतीय जनता पार्टीकडे काम घेऊन येऊ नका असा सज्जड दम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना दिला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते. या मतदारसंघात भाजपकडून अमल महाडिक विरुद्ध काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात लढत होत आहे.

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना निवडून आणणण्यात भाजपचाही सिंहाचा वाटा आहे. “आमचं ठरलयं’ची मदत झाल्याचे सांगत ते विरोधकांना मदत करत असतील, तर भाजपची त्यांना मदत झाली नाही का, असा सवालही पाटील यांनी.केला आहे. आम्हाला गद्दारी जमत नाही म्हणूणच रोष पत्करुन आम्ही युतीधर्म पाळला. आता तुम्ही युती धर्म पाळा नाहीतर एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.

COMMENTS