शिवसेना-भाजपच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य !

शिवसेना-भाजपच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य !

कोल्हापूर  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीची वारी केल्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये युती होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु त्यानंतरही शिवसेनेनं एकला चलोची आरोळी दिली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना-भाजच्या युतीबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. भाजप आणि शिवसेनेनं मिळून पुढील मुख्यमंत्री ठरवणं उचित होईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भाजपनं शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी शिवसेना आणि भाजप एकत्र न आल्यास मतविभागणीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होण्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच आपला मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येकालाच वाटते. 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्री होईल असे आम्हाला वाटते. खरे तर राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा हे भाजपा-शिवसेनेने एकत्रित येऊन ठरवलं पाहिजे. शिवसेनेने त्यांचा मुख्यमंत्री होणार असा दावा करायचा दुसरीकडे आम्ही आमचा मुख्यमंत्री होणार असे म्हणायचे. यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मतविभाजन फायदा होऊ शकतो असं पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

COMMENTS