… म्हणे मराठ्यांचा इतिहास माझी आणि मुख्यमंत्र्यांची नोंद घेईल – चंद्रकांत पाटील

… म्हणे मराठ्यांचा इतिहास माझी आणि मुख्यमंत्र्यांची नोंद घेईल – चंद्रकांत पाटील

सांगली – मराठा आरक्षणानावरुन राज्यात मराठा समाजात तीव्र असंतोष आहे. मूक मोर्चे, ठोक मोर्चे काढून, अनेक तरुणांनी आत्महत्या करुनही अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपनं दिलं होतं. मात्र सरकार सत्तेवर येऊन 4 वर्ष झाली तरीही आरक्षणाचा पत्ता नाही. तरीही सरकारमधील मंत्री आपण आरक्षणासाठी खूप प्रयत्न करत असल्याचं सांगत आहे. काल सांगलीमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी असंच सांगतिलं. मराठा आरक्षणा बाबत जेंव्हा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या वर चार-चार पाने लिहावी लागतील, इतका आम्ही प्रयत्न करतोय असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.


विदर्भात मराठा बांधव हे कुणबी असा उल्लेख लावतात. 1968 च्या वेळी पश्चिम महारातष्ट्रातील नेत्यांनी कुणबी ऐवजी मराठा असा उल्लेख करायला लावला. जर विदर्भातील मराठा बांधवा सारखा निर्णय त्यावेळी घेतला असता तर, 1968 सालीच आरक्षणाचा प्रश्न सुटला असता असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सांगलीत काल मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागस विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झालं तेंव्हा ते बोलत होते.

COMMENTS