ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत राडा, संतापलेल्या मंत्र्यांनी गावक-यांना बैठकीतून बाहेर हाकललं ! VIDEO

ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत राडा, संतापलेल्या मंत्र्यांनी गावक-यांना बैठकीतून बाहेर हाकललं ! VIDEO

नागपूर –  गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त आणि ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यामधील बैठकीत नागपुर जिल्ह्यातील टेकेपार गावातील काही जणांनी बावनकुळे याच्यासोबत वाद घातला आहे. त्यामुळे संतापलेल्या बावनकुळे यांनी काही नागरिकांना बैठकीतून बाहेर हाकललं आहे. टेकेपार गावासंदर्भात उच्च न्यायालयाचे काही निर्देश असल्याने शासन त्याला बांधील आहे. मात्र गावकरी ऐकायला तयार नसल्याने वाद वाढला आणि अखेर बावनकुळेंनी काहींना बैठकीतून बाहेर हाकलले. त्यामुळे गावक-यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी याविरोधात आमदार निवासात गोसीखुर्द प्रकल्प ग्रस्तांसोबत रात्रभर आंदोलन केलं होतं. त्यानंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी रात्री आंदोलक आणि बच्चू कडूंची भेट घेतली. मात्र चर्चा निष्फळ झाली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा बैठक घेण्यात आली. या बैठकीत बच्चू कडू आणि पालकमंत्री बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेनंतर गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी, आणि सरकारचे प्रतिनिधी राहणार असून येत्या सात दिवसात ही समिती गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर पाहणी करुण अहवाल देणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. त्यानंतर बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.

 

COMMENTS