‘त्या’ डॉक्टरांवर केंद्रिय मंत्री भडकले, “नक्षलवादी संघटनेत भरती व्हा, गोळ्या घालून ठार मारू !”

‘त्या’ डॉक्टरांवर केंद्रिय मंत्री भडकले, “नक्षलवादी संघटनेत भरती व्हा, गोळ्या घालून ठार मारू !”

चंद्रपूर – चंद्रपूरमधील शासकीय रुग्णालयातील अमृत दिनद्याल मेडिकल स्टोअरचा शुभारंभ केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आला.या मेडिकल स्टोअरमधून रुग्णांना २४ तास स्वस्त दरात औषधं देण्यात येमार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त या मेडिकल स्टोअरचे उद्घाटन करण्यात आलं. परंतु उद्घाटनादरम्यान शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर रजेवर गेले असल्याची माहिती अहिर यांना मिळाली. त्यामुळे त्यावेली हंसराज अहीर भडकले असल्याचं पहावयास मिळालं आहे. मी रुग्णालयात येणार हे माहित असून देखील डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारु, असं वादग्रस्त विधान त्यांनी त्यावेळी केलं.

या रुग्णालयातील डॉक्टरांना मी कार्यक्रमाला येणार आहे हे माहीत असताना त्यांनी रजेवर जाणं योग्य नाही. मी जनतेने निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथे येणार हे माहित असूनही डॉक्टर रजेवर कसे काय जाऊ शकतात, असा सवालही त्यावेली त्यांनी उपस्थित केला. तसेच या डॉक्टरांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही गोळ्या घालून ठार मारु असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. अहीर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

COMMENTS