चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस-भाजपचा प्रत्येकी एका जागेवर विजय!

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस-भाजपचा प्रत्येकी एका जागेवर विजय!

चंद्रपूर – शहर मनपाच्या 2 जागांसाठीच्या पोटनिवडणूक निकालात काँग्रेस-भाजपला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवता अला आहे. प्रभाग क्र 6 मध्ये काँग्रेसच्या कलावती यादव तर प्रभाग क्र 13 मधुन भाजपचे प्रदीप किरमे यांचा विजय झाला आहे. या प्रभागात जात प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने बसपा नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले होते. याठिकाणी काल मतदान घेण्यात आले होते. शहर मनपात भाजपची निर्विवाद सत्ता असून यात अता आणखी एका जागेची भर पडली आहे.

नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे बबलू गौतम विजयी झाले आहेत. 19 पैकी 17 नगरसेवक भाजपचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 जागांवर विजय झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागी मिळवता आली नाही. बुटीबोरी नगर परिषद स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक घेण्यात आली.

COMMENTS