मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात भाजपला धक्का, नगर परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय!

मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात भाजपला धक्का, नगर परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय!

चंद्रपूर – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. मूल नगर परिषद पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून भाजप उमेदवार शिल्पा रामटेके यांचा काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी 176 मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये भाजप नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

दरम्यान या पोटनिवडणुकीत काँग्रसचा विजय झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. कारण काही दिवसांवरच विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. अशातच सुधीर मुनगंटीवार यांच्या मूल नगर परिषद पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. भाजप उमेदवार शिल्पा रामटेके यांचा काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी 176 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS