राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, खासदार प्रीतम मुंडेंचा थरारक विमान प्रवास, मोठा अपघात टळला !

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, खासदार प्रीतम मुंडेंचा थरारक विमान प्रवास, मोठा अपघात टळला !

औरंगाबाद – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना आज थरारक विमान प्रवासाचा अनुभव आला. मुंबईहून औरंगाबादला विमानातून येत असताना विमान टेक ऑफ झाल्यानंतर दहा मिनिटांतच विमानातील प्रवाशांना पायलटने वातावरण खराब असल्याचं सांगितलं आणि सीटबेल्ट लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काही क्षणातच विमान हेलकावे देत  हवेच्या पोकळीत गेले व खाली उतरु लागले. जवळपास पाच ते सात मिनीटे हे विमान खाली उतरत होते. त्यामुळे विमानातील सर्वच प्रवाशी घाबरले होते.

हा सगळा थरार तब्बल पाच ते सात मिनिटे सुरू होता. मात्र त्यानंतर विमान सुरळीत  झालं आणि प्रवाशांना यानंतर पुन्हा एकदा लँड होताना विमानाचा आवाज केला. एक हार्ड लँडिंग प्रवाशांनी अनुभवलं. अनेक प्रवाशांना त्यामुळे  हा विमान प्रवास जीवघेणा होता की काय असं वाटू लागलं. मात्र सुदैवानं सुखरूप आल्याने त्यांनी ईश्वराचे आभार मानले.

या विमानात खासदार प्रीतम मुंडे, शहरातील काही उद्योजक, राजकीय नेते प्रवास करत होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

 

COMMENTS