छगन भुजबळ पुन्हा हायकोर्टात !

छगन भुजबळ पुन्हा हायकोर्टात !

मुंबई – महाराष्ट्र सदन घोटाळ्याबरोबरच बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचा आरोपाखाली शिक्षा भोगत असलेले  छगन भुजबळ यांनी जामिनासाठी पुन्हा एकदा हायकोर्टात आव्हान दिलं आहे. पीएमएलए कोर्टानं फेटाळलेल्या जामिनाला भुजबळांनी आव्हान दिलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना आतातरी जामीन मिळणार का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

दरम्यान छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच न्यालयाकडे जामीन अर्ज केला होता. परंतु पीएमएलए कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा एकदा हायोकोर्टात जामीनसाठी अर्ज केला असून फेटाळलेल्या जामीनाला त्यांनी आव्हान दिलं आहे. गेल्या दोन वर्षापासून छगन भुजबळ हे आर्थर रोड जेलमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच भुजबळ यांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांनी राज्यभरात आंदोलन केलं होतं.

COMMENTS