…तर अमित शाहांना बाळासाहेबांनी अशी लाथ मारली असती की, ते परत मुंबईत आलेच नसते – छगन भुजबळ

…तर अमित शाहांना बाळासाहेबांनी अशी लाथ मारली असती की, ते परत मुंबईत आलेच नसते – छगन भुजबळ

रायगड – राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी सरकावर जोरदार टीका केली आहे. अनिल अंबानी यांनी खेळण्यातले विमानही कधी बनवलं नाही आणि त्यांना कंत्राट दिलं असल्याचा टोला बुजबळ यांनी लगावला आहे. ते राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेदरम्यान बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधी मंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, अनिल देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण, आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार जयदेव गायकवाड, आदींसह पक्षाचे इतर सर्व नेते उपस्थित होते.

दरम्यान ‘यांची डिग्री फेल, लग्न फेल, घर फेल, चाय फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटाबंदी फेल, मेक इन इंडिया फेल आणि आता राफेल. अनिल अंबानी यांनी खेळण्यातले विमानही कधी बनवलं नाही आणि त्यांना कंत्राट दिलं’, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच अमित शहांनी पटक देंगे म्हटल्यावर बाळासाहेबांनी अशी लाथ मारली असती, की ते मुंबईत परत आले नसते’ युती करायची तर करा, लोकांना का फसवता? असा सवाल यावेळी छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

COMMENTS