लोकं मागतात चारा व छावण्या, सरकार देतेय डान्सबार आणि लावण्या – छगन भुजबळ

लोकं मागतात चारा व छावण्या, सरकार देतेय डान्सबार आणि लावण्या – छगन भुजबळ

अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी पाथर्डी येथील जाहीर सभेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाथर्डीमध्ये ११९ टँकर सुरू आहेत. याठिकाणी लोकं मागतात चारा व छावण्या सरकार देतेय डान्सबार आणि लावण्या,  बाईला नाचवा आणि गाईला वाचवा असे हे भाजप सरकार असल्याची जोरदार टिका भुजबळ यांनी केली आहे.

दरम्यान माझं तोंड बंद करण्यासाठी मला जेलमध्ये टाकले. माझं सगळं जप्त केले. आता कपड्यावर आहे. परंतु तुम्ही माझ्या जनतेचे प्रेम कधीच जप्त करु शकत नाही. मी बोलणार मला बोलण्यापासून रोखू शकत नसल्याचंही भुजबळ यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या विम्यापोटी ५५ हजार कोटीचा फायदा अंबानीच्या विमा कंपनीला झाला आहे असे अहवालातून समोर आले. अक्षरशः तुमचा पैसा लुटण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोपही आमदार छगन भुजबळ यांनी केला आहे.


COMMENTS