मला दाबण्याचा प्रयत्न केला तरी तितक्याच ताकदीने उभा राहीन – छगन भुजबळ

मला दाबण्याचा प्रयत्न केला तरी तितक्याच ताकदीने उभा राहीन – छगन भुजबळ

नाशिक – मी परमेश्वराकडे एकच मागणे मागतो मला खूप मोठे आयुष्य दे, परंतु त्यामध्ये असं दे की वाघासारखा जगेन शेळीसारखा नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा आजचा सहावा दिवस असून परिवर्तन यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याची सुरुवात नाशिक जिल्हयातून झाली. गुरुवारी दिंडोरी शहरात झालेल्या सभेत छगन भुजबळ यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली.

दरम्यान नुसत्या घोषणा करणाऱ्या या भाजप सरकारची नुसती नौटंकी सुरु आहे असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. मी गप्प बसणार नाही. मला दाबण्याचा प्रयत्न केला तरी तितक्याच ताकदीने जनतेसाठी उभा राहीन असेही त्यांनी सांगितले. नारपार प्रकल्पातील पाण्याचा एक थेंबही गुजरातला देणार नाही, यासाठी शहीद झालो तरी हा लढा सोडणार नाही, असही भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे.

ओबीसींच्या मतांसाठी भाजपा सरकार ७०० कोटींचा निधी जाहीर करत आहे. मात्र, आता तुमच्यावर घरी बसण्याची वेळ आली आहे. मग ७०० कोटी रुपये देणार कुठुन असा स वाल भुजबळ यांनी केला आहे. ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला आहे.

COMMENTS