छगन भुजबळांच्या ‘त्या’ पहिल्या ट्वीटला कार्यकर्त्यांचं उत्तर !

छगन भुजबळांच्या ‘त्या’ पहिल्या ट्वीटला कार्यकर्त्यांचं उत्तर !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज ट्विटरवर एंट्री मारली आहे. त्यानंतर त्यांनी पहिलं ट्वीट केलं असून त्यांच्या या ट्वीटला कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं आहे. कार्यकर्त्यांशी आपण लवकरच संवाद साधणार असून माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो,माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली, त्यामुळे मी आपला आभारी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात,याची मला कल्पना आहे.माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार असल्याचं ट्वीट भुजबळांनी केलं आहे.

दरम्यान त्यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी हे ट्वीट केलं असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे. त्याचप्रमाणे  तुमची आम्ही आतुरतेने वाट पाहत असल्याचे एका कार्यकर्त्याने म्हटले आहे. तसेच आपल्याला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे असेही एकाने ट्वीट केले आहे.  तसेचा आपल्या कणखर नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज असल्याच आव्हानही काही नेटीझन्सने केलं आहे.

 

 

 

 

COMMENTS