छत्तिसगडमध्ये भाजपला धक्का, काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल, मध्यप्रदेश आणि राजस्थानातही काँग्रेस आघाडीवर !

छत्तिसगडमध्ये भाजपला धक्का, काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल, मध्यप्रदेश आणि राजस्थानातही काँग्रेस आघाडीवर !

रायपूर – पाच राज्यातल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये कल आता पर्यंत आले आहेत. त्यानुसार छत्तिसगडमध्ये सत्ताबदल होत असल्याचं दिसत आहे. एकूण 90 जागांपैकी काँग्रेस तब्बल 50 ठिकाणी आघाडीवर आहे. तर भाजप 35 ठिकाणी आघाडीवर आहे. विशेष म्हणज्ये भाजपचे मुख्यमंत्री रमणसिंग पिछाडीवर आहेत.

मध्य प्रदेश आणि राजस्थानात दोन्ही ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे. मध्यप्रदेशमध्ये आतापर्यंत काँग्रेस 102 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 94 ठिकाणी आघाडीवर आहे. राजस्थानात काँग्रेस 87 जागांवर  आघाडीवर आहे. तर भाजप  73 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगाणात अपेक्षेप्रमाणे टीआरएसची बहुमताकडे वाटचाल आहे. मिझोरामध्ये मात्र काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे.

COMMENTS