छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी हे चार दिग्गज नेते उत्सूक, राहुल गांधी कोणाला देणार संधी ?

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी हे चार दिग्गज नेते उत्सूक, राहुल गांधी कोणाला देणार संधी ?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश आणि राजस्थानातील मुख्यमंत्रिपदाचा तोडगा निघाल्यानंतर आता छत्तीगडच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी चार दिग्गज नेत्यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी या चारही दिग्गज नेत्यांसोबतचा फोटो ट्वीट केला आहे. त्यामुळे यापैकी कोणत्या नेत्याला राहुल गांधी मुख्यमंत्र्याची संधी देणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

राहुल गांधी यांनी आज टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत या चार नेत्यांशी आपल्या निवासस्थानी चर्चा केली. हे चारही नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असून राहुल यांनी त्यांचे मत जाणून घेतले. बैठकीला पक्षाचे केंद्रीय पर्यवेक्षक मल्लिकार्जुन खर्गे, छत्तीसगड प्रभारी पुनिया उपस्थित होते. छत्तीसगडच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा १७ डिसेंबर रोजी रायपूरच्या सायन्स कॉलेज ग्राउंडवर होईल, असेही पुनिया यांनी नमूद केले.

दरम्यान रायपूरमध्ये रविवारी दुपारी १२ वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहीत काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांनी दिली आहे.

COMMENTS