छत्तीसगडमध्ये भाजपला मोठा हादरा !

छत्तीसगडमध्ये भाजपला मोठा हादरा !

नवी दिल्ली – छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा हादरा बसणार असल्याचं दिसत आहे. ९० जागा असलेल्या छत्तीसगडध्ये काँग्रेस 64 तर भाजपा 18 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठ्या जागांचा फरक असल्याचं दिसत आहे. गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला आव्हान देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ‘चावलवाला बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री रमणसिंग यांनी लागोपाठ चौथ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावली होती. परंतु त्यांची ही ताकद कमी पडली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान मागच्या वर्षी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपला ४१ टक्के तर काँग्रेसला ४०.३ तर बसपला चार टक्के मते मिळाली होती. परंतु या निवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून मोठा हादरा बसणार असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS