मुख्यमंत्री आज अण्णा हजारेंच्या भेटीला

मुख्यमंत्री आज अण्णा हजारेंच्या भेटीला

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक दिवसांच्या राळेगण सिद्धीच्या दौऱ्यावर आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची  मुख्यमंत्री फडणवीस भेट घेणार आहेत.

ग्रामसुरक्षा दल आणि सौरउर्जा प्रकल्प यांचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगण सिद्धीला येत आहेत.

आज दुपारी मुख्यमंत्री आणि अण्णांची भेट होणार आहे. मध्यंतरी अण्णा हजारेंनी लोकपालच्या मुद्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर अण्णांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राळेगणसिद्धीचा आजचा दौरा आखल्याचं बोललं जातंय.

 

 

COMMENTS