चिंतन शिबीरात भाषणादरम्यान नेत्यांना डोळा लागला, अन् अजित दादा भडकले !

चिंतन शिबीरात भाषणादरम्यान नेत्यांना डोळा लागला, अन् अजित दादा भडकले !

कर्जत – राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात काल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणादरम्यान काही नेते झोपले होते. अजित पवारांनी हे पाहताच त्यांचा पारा चढला. माझ्या आणि  साहेबांच्या भाषणाला झोपलात तर याद राखा, असे झोपलात तर कायमचे झोपाल असा सज्जड इशाराच त्यांनी झोपलेल्या नेत्यांना दिला.

आता डोळे  मिटले तर कामचे डोळे मिटावे लागतील असा इशारा देतानाच तुम्ही जर आता झोपलात तर सत्तेवरही परत येता येणार नाही असंही अजित पवारांना झोपाळू नेत्यांना छापलं. आता हे झोपलेले नेते कोण होते याची चर्चा पक्षात रंगली आहे.

COMMENTS