त्या मंत्र्यांला चपलेनं झोडला पाहिजे; चित्रा वाघ

त्या मंत्र्यांला चपलेनं झोडला पाहिजे; चित्रा वाघ

मुंबई – मुंबई : भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राठोड यांना आधी चपलेनं झोडपा पाहिजे. त्याच बलात्कारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसत आहेत ही लाजिरवाणी बाब असल्याचा घणाघात भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, राज्य सरकारमध्ये सध्या बलात्कारी मंत्र्यांना आणि नेत्यांना वाचवण्याची चढाओढ सुरु आहे. सगळं माहिती असूनही मुख्यमंत्री काहीच करु शकत नाहीत? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे. संजय राठोडला आधी चपलेनं झोडलं पाहिजे. त्याच बलात्कारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसत आहेत, ही लाजिरवाणी बाब आहे. एवढं सगळं करुनही हा मंत्री आता कसलीही लाज न बाळगता समोर फिरतो आहे. आजवर मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, असं वाटत होतं. पण याच बलात्कारी मंत्र्याला पाठीमागे घालायचं काम ते करत आहेत, असा आरोपही चित्रा वाघ यांनी केलाय. संजय राठोड या बलात्कारी आणि हत्याऱ्याला बाहेर हाकला, असं मुख्यमंत्र्यांना हात जोडून आवाहन असल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या.

COMMENTS