मुंबईतील आरे कॉलनीत एका 4 वर्षीय मुलीवर बलात्कार, चित्र वाघ यांनी घेतली पीडित मुलीच्या कुटुंबियांची आणि पोलिसांची भेट !

मुंबईतील आरे कॉलनीत एका 4 वर्षीय मुलीवर बलात्कार, चित्र वाघ यांनी घेतली पीडित मुलीच्या कुटुंबियांची आणि पोलिसांची भेट !

मुंबई – मुंबईतील आरे कॉलनीमध्ये एका 4 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर लगेचच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आज महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी पिडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. याखेरीज झोन 12 चे डीसीपी डॉ. डी स्वामी यांची देखील चित्रा वाघ यांनी भेट घेतली. आरोपी हा मुलीच्या वडिलांचा मित्र असून अनेकदा पीडित कुटुंबियांच्या घरी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असल्याचा घटना समोर येत आहेत. आज महाराष्ट्र सरकारकडे महिला आयोगाकडे अध्यक्ष नाही. तर 4 हजारांहून अधिक महिलांच्या केसेस पडून असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS