चित्रा वाघ यांनी घेतली राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्याची भेट,चर्चेला उधाण !

चित्रा वाघ यांनी घेतली राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्याची भेट,चर्चेला उधाण !

अहमदनगर – काही जिवसापूर्वीच भाजपमध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेतली आहे. चित्रा वाघ यांनी अहमदनगरमधील माजी माजी जि प अध्यक्षा मंजुषा गुंड यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीकडून गुंड इच्छुक आहेत. परंतु याठिकाणी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहीत पवार यांना उमेदवारी दिली जाणार आहे. अशातच
वाघ-गुंड यांच्या भेट झाल्यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. परंतु ही मैत्रिपूर्ण भेट असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच रोहीत पवार या मतदारसंघातून तयारी करीत आहेत. पक्षाकडून त्यांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. परंतु अलीकडे इच्छुकांच्या मुलाखती झाल्या तेव्हा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांनीही या पदावर दावा केला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रस्सीखेच सुरू असताना अशातच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

COMMENTS