लोकसभेच्या ‘त्या’ जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने !

लोकसभेच्या ‘त्या’ जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने !

नवी दिल्ली  आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडी केली जाणार असल्याची माहिती मिळाली असतानाच भंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने आले असल्याचे दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ही जागा आपणच लढवणार असल्याचं जाहीर केलं. मात्र ही जागा राष्ट्रवादीला सोडायची की नाही, याबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेतील, असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान ही जागा आपणच लढवणार असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे तर काँग्रेसनेही या जागेवरचा आपला दावा कायम ठेवला असल्याचं दिसून येत आहे. याबाबत नाना पटोले राहुल गांधींची भेट घेणार आहेत. त्यानंतर ही जागा नेमकी कोण लढवणार, याबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे.तसेच  निवडणूक कुणीही लढवली तरी भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र लढू, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. 28 मे रोजी गोंदिया-भंडारा आणि पालघरची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS