मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर खासदार गोपाळ शेट्टींनी निर्णय बदलला !

मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर खासदार गोपाळ शेट्टींनी निर्णय बदलला !

मुंबई – गेली दोन दिवसांपासून खासदार गोपाळ शेट्टी हे वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.ख्रिश्चन धर्मीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांची कानउघडणी केली होती. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी आपण वेळ पडली तर राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोननंतर मात्र गोपाळ शेट्टी यांनी आपला निर्णय बदलला असल्याची माहिती आहे.

दरम्यान मालाड मालवणीतील एका सभेत गोपाळ शेट्टी यांनी ‘स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्चनांची भूमिका नव्हती. कारण ख्रिश्चन म्हणजे ब्रिटिशच होते,’ असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. पक्षश्रेष्ठींकडूनही त्यांची कानउघडणी केली होती. तसेच ख्रिश्चन धर्मीयांमध्ये नाराजी पसरली होती. तर, दोन ख्रिश्चन व्यक्तींनी शेट्टींविरोधात पोलिसात तक्रारही दिली असल्याची माहिती आहे. परंतु ख्रिश्चन धर्मीयांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचं गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS