मुख्यमंत्र्यांनी खडसेंसोबत एका कार्यक्रमात येणं टाळलं ?

मुख्यमंत्र्यांनी खडसेंसोबत एका कार्यक्रमात येणं टाळलं ?

जळगाव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यासोबत एका कार्यक्रमात येणं टाळलं असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौ-यावर जाणार होते. जळगावमधील फूड पार्क, जैन व्हॅली येथील मसाले प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम होता. या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होतं. परंतु अचानक मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला जाण्याचं टाळलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.

दरम्यान या कार्यक्रमाला एकनाथ खडसे देखील उपस्थित राहणार असल्यामुळे एकाच मंचावर येणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. एकनाथ खडसे हे गेली अनेक दिवसांपासून भाजप आणि सरकारवर नाराज आहेत. तसेच एकनाथ खडसे यांनी अनेकवेळा जाहीर कार्यक्रमात सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी खडसेंसोबत एका स्टेजवर येणं टाळलं असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

 

 

COMMENTS