‘या’ अपक्ष आमदारांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा!

‘या’ अपक्ष आमदारांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा!

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांसमवेत एकत्रितपणे अनेक विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा मनोदय यावेळी सर्वांनी बोलून दाखविला. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेत ३ आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर (नालासोपारा), शेकापचे श्यामसुंदर शिंदे (लोहा), जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे (शाहूवाडी), अपक्ष आमदार सर्वश्री रवी राणा (बडनेरा), संजय मामा शिंदे (करमाळा) उपस्थित होते.

तसेच गीता जैन (मीरा भाईंदर), महेश बालदी (उरण), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र राऊत (बार्शी), प्रकाशअण्णा आव्हाडे (इचलकरंजी) इत्यादी उपस्थित होते. यावेळी राज्यातील पाण्याचे विविध प्रश्न, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, राज्य सरकारच्यावतीने मदतीसाठी घेतलेला पुढाकार इत्यादी अनेक विषयांवर चर्चा झाली.

COMMENTS