इलाका तो कुत्तो का होता है, शेर का नही, हम तो शेर है –मुख्यमंत्री

इलाका तो कुत्तो का होता है, शेर का नही, हम तो शेर है –मुख्यमंत्री

वसई  इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नही. हम शेर है असा हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि ठाकूर घराणाऱ्यावर केला आहे. पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीनिमित्त मुख्यमंत्र्यांची नालासोपाऱ्याच सभा झाली. त्यावेळी त्यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी उपस्थित होते.

दरम्यान “मी इकडे येत होतो, तेव्हा मला कोणीतरी विचारलं, देवेनभय्या कुठे निघालात? त्यावेळी मी सांगितलं सभेसाठी वसई-नालासोपाऱ्याला निघालोय. मग मला सांगण्यात आलं त्या भागात, त्या इलाक्यात का जाताय? तो परिसर, तो इलाका तर ‘शिट्टी’चा आहे. त्यावेळी मी सांगितलं, अरे इलाका तर कुत्र्या-मांजरांचा असतो, आम्ही तर सिंह आहोत. सिंह जंगलाचा राजा असतो. त्याच्यासाठी कोणताच इलाका नसतो, पूर्ण जंगलच त्याचा इलाका असतो. सिंह जिथे जाईल तो भाग त्याचा होतो असं मुख्यमंत्र्यांनी म्टलं आहे.

दरम्यान लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. आमची शिट्टी नाही वाजली तर तुमची शिट्टी वाजेल, तुमचं पाणी बंद करुन टाकू, तुम्हाला  बघून घेतलं जाई अशी धमकी दिली जात आहे. मात्र घाबरुन जाऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS