“क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खोटी असेल तर उद्धव ठाकरेंवर कारवाई करा !”

“क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खोटी असेल तर उद्धव ठाकरेंवर कारवाई करा !”

पालघर – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील राजकीय वातावरण आता चांगलंच तापत असल्याचं दिसत आहे. प्रचारसभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप जगजाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसनं आता या वादात उडी घेतली असून ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणाची तात्काळ चौकशी करुन कारवाई करावी. क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा आणि जर क्लिप खोटी असेल तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालघरमधल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभाषण झाल्याचा दावा त्यांनी केला असून या ऑडिओ क्लिपची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परंतु भाजपनं याबाबत प्रतिक्रिया दिली असून पराभव समोर दिसू लागल्यामुळे सैरभैर झालेल्या शिवसेनेकडून अर्धवट आणि एडिट केलेली ऑडिओ क्लिप दाखवली जात आहे. या संदर्भात आज निवडणूक आयोगाकडे भाजप तक्रार करणार आहेच, पण त्याबरोबर खरी क्लिपही जाहीर करणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण ?

एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेलएखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता… आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेलतर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?
ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहेतो आता शांत बसूच शकत नाही
आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे
ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा…
सामदामदंडभेद…
ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.
कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येतेहे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे.
अरे ला कारेच करायचं..
अरे ला कारे‘ मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे 

COMMENTS