मुख्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळाचा आढावा, पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा आढावा घेण्याचे निर्देश !

मुख्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळाचा आढावा, पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा आढावा घेण्याचे निर्देश !

मुंबई – दुष्काळाचा आढावा आज घेण्यात आला. १२११६ गावांमधे ४७७४ टँकर्स देण्यात आले आहेत. १२६४ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत यात ७ लाख ४४ हजार मोठा जनावरं आणि जवळपास १ लाख लहान जनावरं म्हणजे जवळपास साडेआठ जनावरं आहेत. मोठ्या जनावरांना ९० आणि लहान जनावरांना ४५ रुपये दर देण्यात आला आहे. चा-याची उपलब्धता ५८ हजार हेक्टर जमीनीवर आहे. दुष्काळाकरता जी थेट मदत करतो ती ८२ लाख शेतक-यांपैकी ६८ लाख शेतक-यांना खात्यात मिळाली आहे, ४४१२ कोटी रुपये त्यात देण्यात आले आहेत. ३२०० कोटी रुपये विम्याचे देण्यात येणार आहेत, त्यातले ११०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. व्हेरीफिकेशन करण्यासाठी थांबलो आहोत बाकी जिल्हाधिका-यांपर्यंत पैसे देण्यात आले आहेत.

पाण्याचे टँकर्स औरंगाबाद विभागात पाहायला मिळतायंत. जायकवाडीत मृतसाठा वापरला जातोय. पण तिथे मृतसाठा भरपूर आहे त्यामुळे ते पाणी आत्ता वापरता येईल अशी परिस्थिती आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आचारसंहितेची कोणतीही अडचण नाहीये. आम्ही आज निर्देश दिले आहेत की पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यांचा आढावा घ्यावा. त्यांनी चारा छावण्यांचा आढावा घ्यावा, पाण्याच्या टॅंकर्सना जीपीएस लावण्यात आलंय त्यामुळे त्यांनी त्याचीही पडताळणी करावी. आपण २०११ चा लोकसंख्येचा निकष न लावता २०१८ चा लोकसंख्येचा निकष पाण्याच्या टॅंकर्सचा निकष मानावा. राज्यात २ लाख ७२ हजार मजूर मनरेगावर काम करतायंत. ९१ टक्के मजूरी वेळेत दिलीये. स्थलांतरण रोखण्यासाठी आम्ही सूचना दिल्या आहेत. अतिरिक्त अन्नधान्य आणि शालेय पोषण आहार देतोय. अल निनोमुळे पाऊस थोडासा उशीरा येईल ही शक्यता आमची चिंता वाढवणारी आहे. पूर्व किनारपट्टीवर येणा-या चक्रीवादळामुळे तापमान कमी होईल आणि पाण्याची समस्या थोडी कमी होईल अशी अपेक्षा आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS