रामभाऊ तुम्ही आधुनिक हनुमान बना पण… – मुख्यमंत्री

रामभाऊ तुम्ही आधुनिक हनुमान बना पण… – मुख्यमंत्री

मुंबई – भाजपचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांचा दहीहंडी उत्सव आज मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हजेरी लावली होती. आज इतर दहीहंडी पहिल्या पण घाटकोपरची दहीहंडी सर्वात मोठी आहे. तसेच भ्रष्टाचार अनाचाराची दहीहंडी आपण फोडल्याशीवाय राहणार नाही. रामभाऊ तुम्ही हनुमान बना पण आधुनिक हनुमानाने स्वतःच्या शेपटीला आग लावायची गरज नसून अन्यायाला संपवण्याची गरज असल्याचं वक्तव्य यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान या दहीहंडी उत्सवाचं आयोजन दरवर्षी राम कदम हे अतिशय देखणे करतातअसंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच शिक्षणमंत्री विनोद तावडेजी, खासदार किरीट सोमय्या,आमदार आशिष शेलार, शेखर सुमन यांच्यासह अनेक नेत्यांनी राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावली.

COMMENTS