…अशी धाडसाची कामे केवळ नारायण राणेच करू शकतात – मुख्यमंत्री

…अशी धाडसाची कामे केवळ नारायण राणेच करू शकतात – मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग –  माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या लाईफटाईम हॉस्पिटलचे उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले आहे. सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण जिल्ह्यात 650 बेडचे रुग्णालय उभारणे हे मोठे धाडसाचे काम आहे आणि अशी धाडसाची कामे केवळ नारायण राणेच करू शकतात. जगाच्या पाठीवर जे उपचार होतात तेच उपचार या रुग्णालयात होणार आहेत. आता यापुढे या जिल्ह्यातील जनतेला उपचाराविना जीवास मुकावे लागणार नाही असं वक्तव्य यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

नारायण राणे यांच्यासारखा एक चांगला नेता दिला. याबद्दल प्रथम या जिल्हावासीयांचे अभिनंदन आहे. ज्यांनी अशा प्रकारचे हे भव्य, जागतिक दर्जाचे अद्ययावत असे रुग्णालय तयार केले. हा त्यांचा धाडसी निर्णय आहे. अशा प्रकारचे रुग्णालय राणे यांनी मुंबईत सुरू केले असते तर त्यांना मोठा बिझनेस मिळविता आला असता. त्यांनी यासाठी घातलेल्या पैशाचा मोठ्या प्रमाणावर परतावा मिळाला असता. मात्र, त्यांना पैशापेक्षा आपल्या माणसांच्या प्रेमाचा परतावा महत्त्वाचा वाटला म्हणूनच त्यांनी या जिल्ह्यातील नव्हे तर कोकणातील लोकांसाठी हे भव्य आणि अद्ययावत असे रुग्णालय सुरू केले असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, खा. तेंडोलकर, रमाकांत खलप, सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, गोव्याचे गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, नीलम राणे, आ. नीतेश राणे, माजी खा. नीलेश राणे, जि. प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, लाईफटाईम रुग्णालयाचे डॉ. आर. एस. कुलकर्णी उपस्थित होते.

 

 

COMMENTS