विधानसभेत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय नेतृत्वाकडे साकडे !

विधानसभेत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय नेतृत्वाकडे साकडे !

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं एकला चलोची हाक दिली आहे. परंतु तरीही शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेला शिवसेनेला सोबत घेणे गरजेचे असून शिवसेनेची नाराजी दूर करावी असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाला घातले आहे.

दरम्यान काल राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या वरिष्ठांची भेट घेतली. यावेळी लोकसभेसबोतच विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला सोबत घ्यावे अशी आग्रह भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.

विधानसभा निवडणूकीत भाजप आणि शिवसेना दोघांनी सोबत जायला हवं असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप संघटन सरचिटणीस रामलाल यांच्या समोर मांडले असल्याची माहिती आहे. त्यासाठी शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जाणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेची नाराजी दूर होणार का असा सवाल आता राजकीय वर्तुळात केला जात आहे.

COMMENTS