मुख्यमंत्र्यांची आजची भविष्यवाणी खरी ठरणार का ?

मुख्यमंत्र्यांची आजची भविष्यवाणी खरी ठरणार का ?

रायगड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका कार्यक्रमात केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. पुढील दहा ते पंधरा वर्ष विरोधक सत्तेत येणार नसल्याची भविष्यवाणी मुख्यमंत्र्यांनी आज कर्जतमधील एका कार्यक्रमात केली आहे. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीची अवस्था पाण्याविना मासा अशी झाली असून तुम्हाला आता तडफतच रहावं लागेल अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.

रागडमधील एका कार्यक्रमाला आज मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी पुढील दहा ते पंधरा वर्ष ते सत्तेवर येणार नसून या कालावधीत आमचीच सत्ता राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपकडून चुका होतील पण बैमानी होणार नसल्याचा दावाही त्यावेळ मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली आजची भविष्यवाणी खरी ठरणार का याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

COMMENTS