मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला देणार आणखी एक गिफ्ट?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला देणार आणखी एक गिफ्ट?

मुंबई – शिवसेनेचा आज 53 वा वर्धापनदिन आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी 6 वाजता या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आजच्या या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला आणखी एक गिफ्ट देणार असल्याची चर्चा आहे. ते गिफ्ट म्हणजे विधानपरिषदेचं उपसभापतीपद शिवसेनेला दिलं जाण्याची निवडणूक शक्यता आहे. सध्या उपसभापतीपद हे रिक्त असून या पदावर निवडणूक व्हावी यासाठी भाजपा आणि शिवसेना आग्रही आहेत. त्यामुळे ही निवडणूक झाल्यास युतीकडून उपसभापतीपद शिवसेनेला दिलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान शिवसेनेच्या वर्धापन दिनाला पहिल्यांदाच इतर पक्षातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडेही लक्ष लागलं आहे. कारण सामनातून ठाकरे यांनी पुढील वर्धापन दिनाला शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे याबाबतही उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS