काँग्रेस आमदाराच्या घरी मुख्यमंत्र्यांचा पाहूणचार!

काँग्रेस आमदाराच्या घरी मुख्यमंत्र्यांचा पाहूणचार!

पंढरपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाची शासकीय महापूजा आज पंढरपुरात पार पडली. रात्री सव्वादोन वाजता विठ्ठलाच्या पूजेला सुरुवात झाली आणि 3 वाजता सांगता झाली. त्यानंतर तीन ते साडेतीन रुक्मिणी मातेची पूजा झाली. या पुजेनंतर राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठ्ठलाकडे घातलं.

त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आमदार भारत भालके यांच्या घरी पाहुणचार घेतला. यावेळी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ही उपस्थिती होती. या भेटीनंतर भालके यांनी मुख्यमंत्री माझ्याकडे येणं यात राजकारणाचा कोणताही भाग नाही. मागील वर्षी मुख्यमंत्र्यांना महापूजा करता आली नव्हती. त्यामुळे आज त्यांना घरी बोलवलं असल्याचं स्पष्टीकरण आमदार भालके यांनी दिलं. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भालके हे भाजपमध्ये प्रवेश करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

COMMENTS