मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री, अमित शाहांमध्ये बैठक, नाराज शिवसेनेला देणार महत्त्वाची खाती ?

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री, अमित शाहांमध्ये बैठक, नाराज शिवसेनेला देणार महत्त्वाची खाती ?

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात आज बैठक बैठक होणार आहे. अमित शाह यांच्या दिल्लीती निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्य मंत्रीमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळणार असून मंत्रिमंडळाची यादी निश्चित करण्यासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या मंत्रिमंडल विस्तारात नाराज शिवसेनेला महत्त्वाची खाती देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले असून आज रात्री ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळातील नावे निश्चित केली जाणार आहेत. दस-यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून नाराज शिवसेनेला मंत्रीमंडळात कोणते खाते द्यायचे आणि प्रदेशानुसार भाजपच्या नवीन आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्याबद्दल चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS