मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘या’ दोन मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘या’ दोन मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर आणि मुंबई अशा दोन ठिकाणाहून मुख्यमंत्री आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघ हा सुरक्षित पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय मान्य झाल्यास देवेंद्र फडणवीस नागपूर आणि मुंबई दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

मलबार हिल भाजपचा बालेकिल्ला असल्याने हा मतदारसंघ मुख्यमंत्री यांच्यासाठी योग्य मानला जात आहे. मलबार हिल हा आमदार मंगल प्रभात लोढा यांचा मतदार संघ असून त्यांच्यावर मुंबई प्रदेश भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर पुढे अन्य जबाबदारी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे याठिकाणाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे.

COMMENTS