मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना खुलं आव्हान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना खुलं आव्हान!

अमरावती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खुलं आव्हान केलं आहे. पाच वर्षात सर्व समस्या आम्ही संपवल्या असा दावा करणार नाही, परंतु गेल्या सरकारने १५ वर्षात केलं नाही त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही पाच वर्षात करुन दाखवलं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यासपीठावर येऊन चर्चा करायला आपण तयार आहोत असं खुलं आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं आहे. तसेच जर आपला पराभव झाला तर जनादेश घेण्यासाठी पुन्हा बाहेर पडणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथून जनयात्रेला सुरुवात केली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना हे आव्हान केलं आहे. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.

दरम्यान जनता हीच आमची राजा आहे. जनता आमचं दैवत आहे. आम्ही मालक नाही, सेवक आहोत, आपण केलेली कामं हे जनतेकडे जाऊन सांगायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी चाललो आहे. आपण केलेल्या कामांची माहिती देणार आहोत आणि पुन्हा एकदा जनादेश घेऊन येणार आहोत. असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

विदर्भात गेल्या पाच वर्षात दीड लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं,यापूर्वी पैसा विदर्भाच्या नावे घ्यायचा आणि आपल्या खिशात टाकायचा अशी अवस्था होती परंतु युतीच्या सरकारने उद्योग विदर्भात अनेक उद्योग आणले. ३० हजार किमीचे रस्ते बांधले. आजपर्यंत कोणी करुन दाखवलं नाही पण या महाराष्ट्र सरकारने करुन दाखवलं असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वात जास्त रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाली. देशात जेवढी रोजगार निर्मिती झाली त्यातील २५ टक्के राज्यात झाली, याआधीच्या सरकारमधील नेते जेव्हा दिल्लीला जायचे तेव्हा हात हलवत परत यायचे. पण मी जेव्हा कधी दिल्लील गेलो तेव्हा मोदींनी मला भरभरुन दिलं. मोदींनी महाराष्ट्राला काही कमी पडू दिलं नाही असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

COMMENTS