…तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही – मुख्यमंत्री

…तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई – शरद पवारांनी केलेला दावा हा धादांद खोटा आहे. मी जर तोंड उघडलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मला ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका असं सांगण्यासाठी सरकारच्यावतीने फोन आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं नका असं करु, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. टीव्ही 9 मराठी’ला देण्यात आलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान मी काही राजकीय औचित्य पाळणारा माणूस आहे. राजकीय नितीमत्ता पाळणाऱ्यापैकी आहे. म्हणून मी त्याबद्दल बोलणार नाही. तसेच मी शरद पवारांना कधीच फोन केलेला नाही की, तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका असंही म्हटलं नाही. परंतु काही फोन मला आले त्याबद्दल जर मी सांगितलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS