मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुन्हा भरकटलं !

मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुन्हा भरकटलं !

कोल्हापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलकॉप्टर पुन्हा भरकटलं आहे. बुधवारी कोल्हापूरदरम्यान ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सांगली- कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. त्यावेळी पुन्हा त्यांचे हेलिकॉप्टर सिग्नल न मिळाल्याने काही मिनिटे हवेत फिरवावे लागले होते.  जवळपास अर्धा तास कोल्हापूर शहरांवर हेलिकॉप्टरने घिरट्या घातल्या. त्यानंतर वारणानगर साखर कारखाना परिसरात ते सुरक्षित लँड करण्यात आले. हेलिकॉप्टर भरकटल्याच्या वृत्ताला पृथ्वीराज देशमुख यांनी स्वत: दुजोरा दिला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने असे काही घडले नसल्याचे सांगत हे वृत्त फेटाळून लावले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सांगली- कोल्हापूर दौ-यावर होते. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रशासकीय आढावा बैठक चार तास तास घेण्यात आली. त्यानंतर त्यांना कडोलीकडे जायचे होते.परंतु हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर कोडोलीकडे जाण्यासाठीचे सिग्नल मिळेनासे झाले. त्यामुळे पायलटने हेलिकॉप्टर कोल्हापूरकडे वळविले तेथे १०-१२ मिनिटे घिरट्या घातल्या. तरीही सिग्नल मिळतच नव्हता. अखेर भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना वारणानगर परिसर माहित असल्याने त्यांनीच पायलटला दिशा दाखविली व हेलिकॉप्टर वारणानगरकडे वळविले.

COMMENTS