मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस, शिवसेना नेत्यांच्या घरी !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस, शिवसेना नेत्यांच्या घरी !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या घरी गेल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.  मुख्यमंत्र्यांनी माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन घरगुती गणेशाचे दर्शन घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर्षी पहिल्यांदाच कृपाशंकर सिंह यांच्या घरी भेट दिली आहे. तसेच यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस हे दरवर्षी शिवसेना पक्ष प्रमुख यांचे स्वीय साहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतात. परंतु यावर्षी  मुख्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी गणेशाच्या दर्शनासाठी गेले होते. तसेच यावेळी त्यांनी विविध विषयांवर सिंह यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

 

COMMENTS