…आणि भर कार्यक्रमात मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी रडू लागले

…आणि भर कार्यक्रमात मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी रडू लागले

बंगळुरू – कर्नाटकमध्ये नुकतीच निवडणुका पार पडल्या जेडीएस आणि कॉंग्रेसने आघाडी करत सत्ता स्थापन केली होती परंतु या दोन्ही पक्षात सर्व आलबेल आहे दिसून येत नाहीये त्याच कारण म्हणजे कर्नाटमध्ये काँग्रेससोबत हातमिळवणी करुन, मुख्यमंत्रिपद स्वीकारुन आनंदात नसल्याचं स्वतः मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी जाहीररित्या सांगितले आहे. ‘आघाडी सरकारचे विष पचवत आहे, मनात आले तर दोन तासांत पद सोडू शकतो’, असे वक्तव्य त्यांनी शनिवारी केले आहे. कर्नाटकमध्ये आघाडीचं सरकार चालवणं म्हणजे विष पिण्यासारखं सारखे आहे, असं विधान खुद्द एच.डी.कुमारस्वामी यांनी केले आहे.

शनिवारी बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबाबत जनता दल सेक्युलरने कुमारस्वामींच्या सन्मानासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केले होते. त्यावेळी कुमारस्वामींनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. कार्यक्रमादरम्यान सरकार चालवताना येणाऱ्या अडचणींचं कथन करताना कुमारस्वामी भावूक झाले आणि यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. ‘कार्यकर्त्यांना वाटत आहे त्यांचा भाऊ मुख्यमंत्री झाला आहे. पण खरं सांगतो. मी आनंदी नाही. माझ्या मनातील वेदना सांगता येत नाहीत. विषापेक्षाही त्या जहाल आहेत. एवढंच सांगतो, सध्या जे काही चाललंय त्यामुळे मी खूश नाही,’ असं सांगत कुमारस्वामी अक्षरश: जाहीर सभेत रडू लागले.

यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दलही आपली व्यथा बोलून दाखवली. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी अधिकाऱ्यांची किती मनधरणी करावी लागली हे मलाच माहीत आहे. आता ‘अण्णा भाग्य स्किम’मध्ये 5 किलो तांदूळऐवजी त्यांना 7 किलो तांदूळ हवे आहेत. त्यासाठी 2500 कोटी रूपये लागणार आहेत. एवढा पैसा मी कुठून आणू? कर लावल्यामुळे माझ्यावर टीका होत आहे. एवढं सर्व होऊनही माझ्या कर्जमाफीच्या योजनेत स्पष्टता नसल्याचे लोक म्हणतात. मनात आलं तर मी दोन तासांत मुख्यमंत्री पद सोडू शकतो. आता या पदावर मी किती दिवस राहिल हे देवच ठरवेल,’ असंही ते म्हणाले.

COMMENTS