मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा स्थगित !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा स्थगित !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यात सुरु असलेली महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा स्थगिती करण्यात आली आहे. ही यात्रा आज बुलडाणा जिल्ह्यात होणार होती परंतु सर्व सभा रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती आहे.

सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल देशभरातून तीव्र दु:ख व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून ‘माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील गौरवशाली अध्याय समाप्त झाला असल्याचं म्हटलं आहे. सुषमा स्वराज यांनी देशासाठी केलेलं काम नेहमीच स्मरणात राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी नरेंद्र मोदी भावूक झालेले दिसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराजला धीर देण्याचाही प्रयत्न केला.

यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा, पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी, यांच्यासह विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते, अनेक राज्यांचे विद्यमान तसंच माजी मुख्यमंत्री आणि सर्वसामान्य नागरिकांनी, सुषमा स्वराज यांचं दर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

COMMENTS