अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा !

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा !

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा समाजाला एसईबीसी (सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास) प्रवर्गाअंतर्गत आरक्षण दिले जाणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र कोट्यातून हे आरक्षण देण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान या आरक्षणासाठी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या मान्यतेची गरज नसून मी स्वत: याबाबत महाअधिवक्तांशी बोललो असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच अहवालाच्या भाषांतराचे काम सुरु असून लवकरच ते पूर्ण होईल असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. तसेच राज्य मागासवर्गीय आयोगाने आपल्या अहवालात तीन शिफारशी केल्या असून त्यात मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि अतिविशिष्ट परिस्थितीचा उल्लेख त्यांनी अहवालात केला आहे. या शिफराशी राज्य सरकारने स्वीकारल्या असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घोषित केल्याने हा समाज आरक्षण घेण्यास पात्र असल्याचे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एसईबीसी हा स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्यात आला असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS