मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर एकाला कोरोनाची लागण !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर एकाला कोरोनाची लागण !

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ या बंगल्यावर एका कर्मचाय्राला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून ‘मातोश्री’ येथिल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण बंगला सॅनिटाईज करण्यात आला आहे. या ठिकाणी पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान मातोश्रीवर एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यामुळे ‘मातोश्री’ येथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. बहुतांश जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. काही रिपोर्ट येणं बाकी असल्याचं एच ईस्ट वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी म्हटलं आहे. तसेच ठाकरे कुटुंबीयांनी कोरोना टेस्ट केल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसली तरी, त्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.

COMMENTS