सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपली, आरक्षणासंदर्भातील ‘या’ मुद्द्यांवर चर्चा !

सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपली, आरक्षणासंदर्भातील ‘या’ मुद्द्यांवर चर्चा !

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यवरांसोबत बोलावलेली बैठक संपली आहे. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच यावेळी मान्यवरांनी राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या असल्याची माहिती आहे. यामध्ये कायद्याबाबतच्या काही तृटींवरही चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला डॉ. आ. ह. साळुंखे, नितीन चंद्रकांत देसाई, पांडुरंग बलकवडे, भैरवनाथ ठोंबरे, अमोल कोल्हे, सतीश परब, सयाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ, अशी ग्वाही गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याचबरोबर कुठल्याही आदोलनादरम्यान हिंसा होऊ नये तसेच आत्महत्येचे पाऊल कोणीही उचलू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.

 

COMMENTS