मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचा आक्षेप, निवडणूक अधिकाऱ्याकडून अर्ज सील!

मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचा आक्षेप, निवडणूक अधिकाऱ्याकडून अर्ज सील!

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जावर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडून सील करण्यात आला आहे. यावर सर्व बाजू तपासून निर्णय घेतला जाईल असं अधिकाय्रांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रावर शिक्का मारणाऱ्या नोटरीची टर्म संपल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेसने उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथपत्रासाठीचं मुद्रांक ३ तारखेला विकत घेतलं होते. शपथपत्राची दस्तनोंदणी करणाऱ्या नोटरीचा शिक्का ही या शपथपत्रावर आहे. मात्र या शिक्क्यामध्ये असलेली नोटरी यांचा कार्यकाल संपण्याची तारिख २०१८ ची आहे.
मुदत संपलेल्या नोटरीने या अर्जावर शिक्का मारलेला असल्याने हे दस्त नियमबाह्य ठरत असा आरोप काँग्रेसनं केला आहे. याबाबतचा अधिक निवडणूक अधिकारी करत आहेत.

COMMENTS